डॉ.शिंगणे काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत! यंदा पराभवाची धूळ चारूच, त्यांनी जनतेला गृहीत धरले! शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकरांचा हल्लाबोल! म्हणाले, डॉ. शिंगणेंचा कुटील.....
Nov 7, 2024, 08:32 IST
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा मतदारसंघात सर्वाधिक काळ सत्ता भोगून देखील डॉ.शिंगणे विकासाच्या बाबतीत पिछाडीवर आहे.अजूनही मतदारसंघात मूलभूत सुविधांची वानवा आहे.जेव्हा सत्ता मिळाली तेव्हा ते मंत्री झाले मात्र त्यांच्या मंत्रिपदाचा मतदारसंघाला काहीच फायदा झाला नाही..त्यांच्या २५ वर्षाच्या सत्ताकाळात त्यांनी मतदारसंघाची वाट लावली..आता त्यांना वाटते की आपण काहीबी केले की लोक आपल्यालाच निवडून देतील..पण डॉ.शिंगणे हे काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत..लोकांना गृहीत धरणाऱ्या डॉ. शिंगणेंचा पराभव करायचाच असा निर्धार आता जनतेने केला आहे, त्यामुळे त्यांना पराभवाची धूळ चारणारच असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे..
२०१४ ते २०१९ या डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या ५ वर्षांत जेवढी विकासकामे झाली तेवढी डॉ.शिंगणे यांना २५ वर्षांत देखील जमली नाही. उलट डॉ.शशिकांत खेडेकर यांनी आमदार नसतांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरीव निधी मतदारसंघात आणल्याचे संतोष भुतेकर म्हणाले. दुसरीकडे शशिकांत खेडेकर यांनी केलेल्या अनेक कामांचे फुकटचे श्रेय घेण्याचे काम डॉ.शिंगणे यांनी केल्याचेही संतोष भुतेकर यांनी म्हटले आहे. आता पराभव समोर दिसल्याने महायुतीत काड्या करण्याचे काम डॉ.शिंगणे यांनी केले असले तरी त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटणार आहे. सिंदखेडराजा मतदारसंघातील जनतेला डॉ.शिंगणे यांची कुटील खेळी लक्षात आली आहे. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात कायम सोबत राहणाऱ्या डॉ.शशिकांत खेडेकर यांनाच जनता यावेळी विजयी करणार आहे..पुढच्या ५ वर्षांत डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या माध्यमातून सिंदखेडराजा मतदारसंघात विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल असेही संतोष भुतेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे..