मेहकरची तहान भागवण्यासाठी आ.डॉ.संजय रायमुलकरांचे "भगीरथी" प्रयत्न! ११२ कोटींची कामे प्रगतीपथावर...! मेहकरची जनता म्हणते, डॉ. रायमुलकरच पाहिजे...
Nov 11, 2024, 09:38 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "जल ही जीवन है" असं म्हणतात.. पाणी ही माणसाची प्रमुख गरज..याच पाण्यासाठी कधीकाळी मेहकरच्या जनतेला वणवण भटकाव लागत होत..मात्र विद्यमान आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात या समस्येचे पूर्णपणे निदान केलं आहे. सभागृहात पाठपुरावा करून, विविध यंत्रणांशी समन्वय ठेवून मेहकर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ११२ कोटींचा निधी आमदार संजय रायमुलकर यांनी मंजूर करून आणला आहे. त्यादृष्टीने कामाला सुरुवात झाली असून कामे प्रगतीपथावर आहेत..
आ.संजय रायमुलकर आणि विकास हे दोन समानार्थी शब्द आहेत. सामान्य जनतेच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारा हा नेता असल्याने या नेत्यावर जनता देखील प्रचंड प्रेम करते..गेल्या ३ निवडणूक आ. रायमुलकर यांनी चढत्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. आ. रायमुलकरांची पहिली पाच वर्षे विरोधी पक्षातच गेली, त्या काळात आ. रायमुलकर जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेले अनेकांनी पाहिले. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सभागृहात भांडताना दिसले. काँग्रेस सत्ताकाळात विदर्भासाठी तसा कमीच निधी उपलब्ध व्हायचा. मात्र हा भेदभाव युती सरकारच्या कार्यकाळात बंद झाला आणि तिजोरी विदर्भाच्या विकासासाठी खुली करण्यात आली. त्यातील अधिकाधिक वाटा मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी मिळावा यासाठी आमदार रायमुलकर प्रयत्नशील राहिले. गेल्या,अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर तर आ. रायमुलकरांनी विकास कामांचा झपाटच लावला. विविध विकास कामांसाठी २ वर्षात तब्बल साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी आ. रायमुलकर यांनी मतदारसंघासाठी खेचून आणला.
पाणीपुरवठा योजना...
मेहकर शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून ७४ कोटी रुपये व अमृत योजनेतून ३८ कोटी रुपयांचा निधी आमदार रायमुलकर यांनी मंजूर करून आणला आहे. या योजनेमुळे संबंध मेहकर शहरात आता सुरळीत आणि दररोज नियमित पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. यामुळे मेहकर शहरातील मायमाऊल्यांचे आशीर्वाद आ. रायमुलकर यांना मिळत आहे..आम्हाला आमदार म्हणून डॉ.संजय रायमुलकरच पाहिजे अशा प्रतिक्रिया अनेक भगिनींनी व्यक्त केल्या...