डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचाराचा धुराळा! शेतकरी, शेतमजुरांची चळवळ डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीशी! कष्टकऱ्यांच्या नेतृत्वाला सभागृहात पाठवण्याचा गावोगावी निर्धार....
Nov 9, 2024, 10:28 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर- लोणार विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांना जनतेतून दमदार समर्थ मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी कष्टकरी शेतमजुरांची चळवळ डॉ.ऋतुजा चव्हाण यांची पाठीशी उभी राहिल्याने त्यांचे बळ दहापटीने वाढले आहे. "आता ही लढाई विकासाची आहे, रोजगार मिळवून देण्यासाठी आहे.. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी आहे.. लोणारला सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ बनवण्यासाठी आहे.." असे डॉ.ऋतुजा चव्हाण गावोगावच्या भाषणात सांगत आहेत. त्यामुळे विकासाचे व्हिजन असलेल्या या नेतृत्वाला सभागृहात पाठवायचेच असा निर्धार अनेकांनी बोलून दाखवला आहे...
विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच डॉ. ऋतुजा चव्हाण शेतकरी चळवळीच्या माध्यमातून मतदार संघात गावोगावी पोहोचले आहेत. पिकविम्याची लढाई, अतिवृष्टीची मदत मिळवून देण्यासाठी ची लढाई यामुळे शेतकरी प्रश्नांवर लढणारी रणरागिणी अशी ओळख डॉ.ऋतुजा चव्हाण यांची निर्माण झाली आहे. व्यवसायाने डॉक्टर व उच्चशिक्षित असल्याने अनेकांचा कल हा त्यांच्याबाजुने आहे. विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांच्याविरुद्ध डॉ.ऋतुजा चव्हाण यांची लढत होतांना दिसत आहे..