डॉ.राजेंद्र शिंगणे २५ ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज! खा.अमोल कोल्हे राहणार उपस्थित! उबाठा गटाला जागा सुटणार असल्याची बातमी निव्वळ अफवा...

 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघावर आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा प्रबळ आहे. या गटाकडून डॉ.राजेंद्र शिंगणे हे उमेदवार असल्याचे जवळ जवळ निश्चित आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे हे २५ ऑक्टोबरला आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान काही माध्यमांत रविकांत तुपकर यांच्यासाठी सिंदखेड राजाची जागा उबाठा गट स्वतःकडे घेणार असल्याचे वृत्त झळकत आहे, मात्र तसे होण्याची शक्यता नसून त्या निव्वळ अफवा असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले..

  सिंदखेडराजा येथे २५ ऑक्टोबरला डॉ.राजेंद्र शिंगणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.विशेष म्हणजे खासदार अमोल कोल्हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद बघता १९९५ पासून डॉ.राजेंद्र शिंगणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. एकदा अपक्ष, ४ विधानसभा निवडणुका घड्याळ या चिन्हावर ते निवडणूक लढले. यंदा मात्र ते तुतारी या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. महायुतीकडून उमेदवार कोण हे अद्याप निश्चित झालेले नाही..