डॉ.राजेंद्र शिंगणेंकडून आमदार श्वेताताईंचे विकासकामांबद्दल कौतुक! डॉ. शिंगणेंचा जुना व्हिडिओ व्हायरल; निधी खेचून आणण्यासाठी श्वेताताई पटाईत, त्यांना अडचण जाणार नाही म्हणाले होते....

 
चिखली विधानसभा मतदारसंघातील अंत्रीतेली येथील विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा २०२३ च्या २५ नोव्हेंबरला संपन्न झाला होता. या कार्यक्रमात डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आमदार श्वेताताईंचे विकास कामांबद्दल तोंडभरून कौतुक केले होते. मी चिखली शहरातील लोकांना भेटलो तेव्हा लोक मला सांगत होते की, "ताई आम्हाला फोन करून विचारतात की,तुमच्या भागात काय काम पाहिजे..मी पैसे घेऊन येते;" हे असं मी पहिल्यांदा पाहतोय असे डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले होते. सरकारमध्ये त्या मंत्री जरी नसल्या आमदार जरी असल्या तरी त्या सक्षम आणि कर्तव्यदक्ष आमदार आहेत. लाथ मारेन तिथं पाणी काढेल अशी ताकद असणाऱ्या आमदार आहेत. त्यामुळं मला खात्री आहे, या भागात अनेक तीर्थक्षेत्र असेल गावांचा विकास असेल निधी खेचून आणण्यासाठी त्या पटाईत आहेत, त्यामुळे त्यांना काही फार अडचण जाणार नाही.." असे डॉ.शिंगणे म्हणाले होते. आता डॉ. शिंगणे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे...