देऊळगावराजाचा पाणी प्रश्न मिटणार! पाणीपुरवठा नळ योजनेला येणार गती ; माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकरांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट...
Feb 28, 2025, 09:26 IST
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतिर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात विकासची गंगा आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर हे भरीव विकास निधी खेचून आणण्यात सरस ठरले आहे. पराभवानंतरही खचून न जाता आमदारकी असो वा नसो केवळ विकास हेच ध्येय समोर ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा शहराची पाणीटंचाई पासून सुटका व्हावी यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पास मान्यता मिळवत ३४ कोटी ८ लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजना देऊळगाव राजा शहरासाठी मंजूर केली आहे.
राज्यातील नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता शासनाच्या निर्णयाच्या तरतुदीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राबविण्यात येत आहे.याच अभियानांतर्गत देऊळगाव राजा नगरपरिषदेचा पाणीपुरवठा प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालयामार्फत राज्यस्तरीय मान्यता मिळाली होती. सदर योजनेचे काम देखील सुरु झाले आहे दुसरा हप्ता निधी मागणीसाठी प्रस्ताव नगरपरिषदेकडून सादर करण्यात आला होता, मात्र नगर परिषदेने स्वहिस्सा भरणा केला नसल्यामुळे स्वहिस्सासाठी मुफ्रा अंतर्गत निधी देण्याचे मागणी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी ना एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यासाठी मंत्रालयात त्यांनी ना . शिंदे यांची भेट घेतली. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना नगर विकास मंत्री ना .शिंदे यांनी संबंधित विभागाला दिली आणी तात्काळ ३ कोटी ४ लाख रुपये मंजूर झाले . या योजनेला आता पुन्हा माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाने गती मिळणार आहे

Advt 👆
माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर विकासाची पावनखिंड यशस्वीपणे लढताना दिसत आहे. यापूर्वी राज्यात सत्ता परिवर्तन होताच मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर त्याच दिवशी त्यांच्याकडे डॉ.शशिकांत खेडेकर यांनी पाच मागण्या सादर केल्या होत्या . त्यामधील एक प्रमुख मागणी होती देऊळगाव राजा शहरासाठी पाणीपुरवठा योजना होती.कारण ही अंतर्गत योजना होणे शहरासाठी अतिशय आवश्यक होते. धरण उशाशी असताना देऊळगाव राजा वाशियांच्या घशाशी कोरड होती त्यामुळे पाणीपुरवठा योजना शहरासाठी मंजूर व्हावी यासाठी माजी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा सुरू होता. मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी सतत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले . पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर देऊळगाव राजा शहराला नियमित मुबलक पाणी मिळणार आहे.सदरहू निधी मंजूर केल्याबद्दल मा.आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी माजी मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना प्रतापरावजी जाधव साहेब यांचे आभार मानले आहे. देऊळगांव राजा वासियांनी मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांचे आभार मानले आहे.