निर्धार विजयाचा! राहुल बोंद्रेंच्या प्रचार सभांना मिळतोय दमदार प्रतिसाद; बाबुलॉज चौक, नूरचौक, गौरक्षण वाडी, बैलजोडी, चिंचपरिसरात कॉर्नर बैठका धुमधडाक्यात....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २० नोव्हेबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचाराने अंतिम टप्यात गती घेतली असून कॉंग्रेस व मविआ चे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांनी थेट शहरी व ग्रामीण जनतेशी संवाद साधून प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पहावयास मिळत असून कार्यकर्ते व मतदारांनी राहुलभाऊच्या विजयाचा निर्धार केल्याचे बोलल्या जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्या पासून राहुलभाऊ बोंद्रे यांनी चिखली मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात जाऊन गावकऱ्याच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या आहे दरम्यान गत दोन दिवसात चिखली शहरातील बाबूलॉज चौक, नुरचौक, गौरक्षण वाडी, बैलजोडी, चिंच परिसरात कॉर्नर मिटिंग व प्रचारसभांचा धुराळा उडाला असून समर्थकाची मिळणारी साथ पाहता राहुल बोंद्रे यांनी चांगलाच माहोल बनवला असल्याचे चित्र आहे..
चिखली शहर व ग्रामीण परिसरात प्रचारा दरम्यान या बैठकीच्या माध्यमातून नागरिकांची एकजूट आणि सामुदायिक विकासाच्या उद्देशाने काम करण्याची भावना दृढ होत असल्याचे मत राहुलभाऊ बोंद्रे यांनी ठीक ठिकाणी आयोजित प्रचार प्रसंगी गावकऱ्याशी बोलतांना व्यक्त केले आहे. मतदारसंघातील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने ग्राम महिमळ व मंगरूळ नवघरे येथे सहकारी, पदाधिकारी, आणि ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत राहुलभाऊचा सन्मान केला. जागो जागी गावकऱ्याकडून मिळणारा प्रतिसाद व समर्थ साथ या उत्साही स्वागतामुळे गावकऱ्यांचे प्रेम आणि पाठिंबा मनाला विशेष उर्जा देणारा ठरला असल्याचे राहुलभाऊ बोंद्रे यांनी बोलून दाखवले.
मतदार संघात प्रचारा निमित्य संपन्न होण्याऱ्या बैठकीच्या वेळी चिखलीच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन राहुलभाऊ यांनी केले.या वेळी उपस्थितांनी समुदायाच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि यामुळे आगामी निवडणुकीत यश मिळविण्याच्या दृष्टीने एकत्रित कार्य करण्यावर जोर देण्यात आला. उपस्थितांच्या उत्साहाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले, ज्यामुळे समृद्ध आणि सहयोगी वातावरण तयार करण्यास मोलाची मदत झाली. चिखली शहरातील बाबूलॉज चौक, नुरचौक, गौरक्षण वाडी या ठिकाणी मुस्लीम बांधवानी प्रचंड प्रतिसाद दिला तर बैलजोडी, चिंच परिसरात देखील कॉर्नर मिटिंग व प्रचारसभांचा उडालेला धुराळा पाहता गावोगावी राहुभाऊच्या होण्याऱ्या मिरवणुक सभा व प्रचार सभांना शहरी व ग्रामीण जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. बैलजोडी चौक येथे प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीत अनेक स्थानिक नागरिकांनी व मविआ च्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.