ठरलं..! व्हॉईस ऑफ मीडियाची जिल्हा बैठक दणक्यात! जिल्हाध्यक्षपदी कृष्णा सपकाळ यांची एकमताने निवड; सुनील मतकर आणि गुलाबराव इंगळे कार्याध्यक्ष....

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्रकार आणि पत्रकारितेसाठी काम करणाऱ्या व्हाईस ऑफ संघटनेची जिल्हा बैठक आणि नवीन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा आज,१० जानेवारीला बुलडाणा येथील पत्रकार भवन परिसरात पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून बुलडाणा लाइव्हचे युवा पत्रकार कृष्णा सपकाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून पुण्यनगरीचे देऊळगाव राजा प्रतिनिधी सुनील मतकर व जळगाव जामोदचे जेष्ठ पत्रकार गुलाबराव इंगळे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.या बैठकीच्या आधी जिल्हाभरातील पत्रकारांचा १० लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात आला. यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य संघटक सुधीर चेके पाटील, डाकघर अधीक्षक गणेश अंभोरे, राज्य कोर कमिटी सदस्य अरुण जैन, विभागीय कार्याध्यक्ष अजय बिल्लारी, विदर्भ संघटक सिद्धार्थ खरात, राज्य कार्यवाहक लक्ष्मीकांत बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती..

  पत्रकारांचे आरोग्य, शिक्षण, घर यासह पत्रकारांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्हाईस ऑफ मीडिया काम करत आहे. गेल्या तीन वर्षात संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून जगातील ४९ देशांमध्ये व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक पत्रकारांनी व्हॉईस ऑफ मीडियाची सदस्य नोंदणी केलेली आहे. सध्या व्हाईस ऑफ मीडियाचा संघटनात्मक बांधणी पंधरवाडा सुरू असून राज्यात ठिकठिकाणी संघटनात्मक निवडणूक सुरू आहेत. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. आज, १० जानेवारीला पत्रकार भवनात पार पडलेल्या जिल्हा बैठकीत राज्य कोअर कमिटी सदस्य अरुण जैन यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून कृष्णा सपकाळ यांच्या नावाची सूचना केली त्याला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने दुजोरा दिला. त्यानंतर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली..
अशी आहे जिल्हा कार्यकारिणी...
जिल्हाध्यक्ष : कृष्णा सपकाळ, बुलढाणा, बुलढाणा लाईव्ह
२) कार्याध्यक्ष : सुनील मतकर, देऊळगाव मही, पुण्य नगरी
३) कार्याध्यक्ष : गुलाबराव इंगळे, जळगाव जामोद, सकाळ
४) उपाध्यक्ष : नीलेश जोशी, बुलढाणा, लोकमत
५) उपाध्यक्ष : मुशीरखान कोटकर, देऊळगाव राजा, सकाळ
६) उपाध्यक्ष : किशोरअप्पा भोसले (एकच घाव, खामगाव)
७) उपाध्यक्ष : समाधान गाडेकर, चिखली, देशोन्नती
८) सरचिटणीस : रफिक कुरेशी, मेहकर, सकाळ
९) सहसरचिटणीस : सुनील तिजारे, बुलढाणा, दै. भास्कर
१०) कोषाध्यक्ष : संदीप शुक्ला, बुलढाणा, लोकशाही चॅनल
११) सहकोषाध्यक्ष : दिनेश मुडे, बुलढाणा, दिव्य मराठी
१२) कार्यवाहक : सुखनंदन इंगळे, बुलढाणा, दिव्य मराठी
१३) कार्यवाहक : ब्रम्हानंद जाधव, बुलढाणा, महाभुमी
१४) संघटक : साबीर अली, बुलढाणा, उर्दू टाईम्स्
१५) संघटक : काशीनाथ मानकर, संग्रामपूर, देशोन्नती
१६) संघटक : पप्पू (गणेश राठी), मोताळा, लोकमत
१७) संघटक : श्याम सोनुने, लोणार, अधिकारनामा
१८) प्रवक्ता : फहीम देशमुख, शेगाव, एमएनसी/पुण्य नगरी
१९) प्रसिद्धीप्रमुख : संदीप वंत्रोले, बुलढाणा, नवराष्ट्र
२०) सदस्य : गणेश उबरहंडे, बुलढाणा, हसरी दुनिया
२१) सदस्य : अमोल खेकाळे, चिखली, काळ-काम-वेग
२२) ज्येष्ठ मार्गदर्शक तथा निमंत्रीत सदस्य : संजय मोहिते, बुलढाणा, लोकसत्ता
२३) ज्येष्ठ मार्गदर्शक तथा निमंत्रीत सदस्य : अनिल (नाना) पळसकर, चिखली, विदर्भ दर्पण
२४) ज्येष्ठ मार्गदर्शक तथा निमंत्रित सदस्य पुरुषोत्तमजी सांगळे, ब्रेकिंग महाराष्ट्र-