ठरलं..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ. शशिकांत खेडेकरांच्या प्रचारासाठी येणार! मंगळवारी देऊळगावराजात जाहीर सभा; डॉ.खेडेकरांची ताकद वाढणार...

 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी प्रचारात जोर धरला आहे. आता दस्तरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी देऊळगावराजात येणार आहेत. मंगळवारी १२ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता नगर परिषदेच्या कार्यालयामागील देसाई ग्राउंड मध्ये भव्य जाहीर सभा होणार आहे.. डॉ.खेदेकरांसाठी आधीच अनुकूल असलेल्या या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमुळे डॉ.खेडेकर यांची बाजू आणखी बळकट होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे..

 सिंदखेडराजा मतदारसंघात "विकासपुरुष" म्हणून मिळवलेला लौकिक खेडेकर यांचे बळ वाढवणारा ठरला आहे. २५ वर्षांचा डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा कार्यकाळ विरुद्ध अवघ्या ५ वर्षात आणलेला तब्बल २३ कोटी रुपयांचा निधी.. माजी आमदार असताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मिळवलेला शेकडो कोटींचा निधी या मुद्द्यांवर डॉ.खेडेकर निवडणूक लढवत आहेत. आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी येणार असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे..