मलकापुरात काँग्रेसचे टेन्शन वाढले! ॲड.हरीश रावळ यांची बंडखोरी; उद्या भरणार अर्ज...! एकडेंचा करेक्ट कार्यक्रम करणार?
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने आधीच विद्यमान आमदार राजेश एकडे यांना मैदानात उतरवले. भाजपचा उमेदवारीचा तिढाही काल दिल्लीत सुटला.. हो नाही हो नाही म्हणता म्हणता पुन्हा एकदा चैनसुख संचेती यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. आता ७१ वर्षांचे चैनसुख संचेती राजेश एकडे यांच्या विरोधात लढणार आहेत.दुसरीकडे राजेश एकडे यांच्यासमोरही आव्हान वाढले असून काँग्रेसची अंतर्गत बंडखोरी त्यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. कारण ॲड.हरीश रावळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
ॲड.हरीश रावळ यांचीही काँग्रेस पक्ष संघटनेवर पकड आहे. काँग्रेसकडे त्यांनी उमेदवारी देखील मागितली होती. मात्र विद्यमान आमदार या नात्याने काँग्रेस श्रेष्ठींच्या दरबारात राजेश एकडे यांचेच वजन भारी ठरले. ॲड.हरीश रावळ आता अपक्ष उमेदवारी भरणार हे निश्चित झाले आहे. बुलडाणा लाइव्ह ने रावळ यांच्याशी संपर्क साधाला असता त्यांनी त्याला दुजोरा दिला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विजयासाठीच निवडणूक लढत आहे असे ॲड.हरीश रावळ "बुलडाणा लाइव्ह"शी बोलतांना म्हणाले....