बुलढाण्यात काँग्रेसच्या फलकाला काळे फासले, प्रदेशाध्यक्ष पोलीस ठाण्यात, मुस्लिम बहुल भागात तणाव... काँग्रेस म्हणते, विरोधकांना पराभव दिसतोय..
Dec 1, 2025, 13:02 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) : बुलढाणा पालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा व पोलीस मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातील काँग्रेसच्या फलकाला काळे फासण्यात आले. यामुळे मुस्लिम बहुल परिसरात आज सकाळी तणाव निर्माण झाला असून राजकीय वर्तुळसह बुलढाणा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान तेलगू नगर चौकातील एका घरावर रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या काँग्रेसच्या प्रचार फलकावर काळे ऑईल टाकून विटंबना करण्यात आल्याचे आज सोमवारी, १ डिसेंबर रोजी सकाळी काही कार्यकर्ते व नागरिकांच्या निदर्शनास आले. याची खबर परिसरात पसरताच तेलगू नगर चौकात जमाव जमला. सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे उमेदवार वसीम शेख, नदीम शेख घटनास्थळी दाखल झाले. याची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, पालिका कर्मचारी देखील परिसरात दाखल झाले. काँग्रेसचे अध्यक्षीय उमेदवार लक्ष्मी दत्ता काकस यांचे हे फलक होते. पोलिसांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने ऑइलने माखलेला काँग्रेस चा फलक खाली उतरवीला. पोलीस व प्रतिष्थित नागरिकांनी समजूत घातल्याने जमाव पांगला.

दरम्यान पोलीस विटंबना करण्यात आलेले फलक, लोखंडी सांगाडा जप्त करून शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची तोंडी तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे ठाण्यात दाखल झाले. त्यांनी प्रकरणचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने तपास करण्याची मागणी रेटली. दरम्यान पोलीस उद्या मंगळवारी, २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानच्या बंदोबस्त चे नियोजन करीत असल्याने काही वेळाने रीतसर तक्रार दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
बुलढाणा शहरात
बुलढाणा पालिकेच्या अध्यक्षीय व नगरसेवकांच्या ३० जागासाठी उद्या २ डिसेम्बरला निवडणूक होऊ घातली आहे. यंदाची निवडणूक माजी आमदार भाजपाचे विजयराज शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय प्रतिष्ठची लढत ठरली आहे.यातच संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड व विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे अध्यक्ष पदाची निवडणूक लढवीत आहे. काँग्रेस ने लक्ष्मी काकस यांना मैदानात उतरविले आहे. यामुळे टोकाच्या चुरशिचे प्रतिबिंब प्रचारात देखील दिसून आले. यातच मतदानच्या तोंडावर काँग्रेसच्या फलका ची विटंबना करण्यात आली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांना उद्याच्या मतदानात वपरवाच्या मत मोजणी दरम्यान अधिक दक्ष राहावे लागणार आहे.