ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंतेत! तुर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका; सोयाबीनने फटका दिल्याने तुरीकडून होती आशा...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदा सोयाबीन मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन अपेक्षित झाले नाही, मजुरीचा उत्पादनाचा खर्चही वाढला. कसेबसे हाताशी पीक आलेले असताना त्या पिकाला भावही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता तुर पिकाकडून अपेक्षा होती.. मात्र आता ही अपेक्षा देखील फोल होते की काय? असे वाटू लागली आहे..कारण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान असल्याने हजारो हेक्टर वरील तुर पिक धोक्यात आले आहे...ढगाळ हवामानामुळे तुरीची फुले झडून खाली पडत असल्याने उत्पादनात मोठी तूट होणार असल्याचे संकेत आहेत...

 

सतत ढगाळ हवामानामुळे तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची देखील. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास १ लाख हेक्टरवर तुरीचे पीक घेण्यात आले आहे. महिन्या दोन महिन्यात हे पीक शेतकऱ्यांच्या घरात येणार आहे, मात्र आता त्याआधीच या पिकावर ढगाळ हवामानामुळे मोठे संकट ओढवले आहे.  

   
ढगाळ हवामानामुळे तुरीला आलेला फुलोरा झडू लागला आहे. आणखी काही दिवस असेच वातावरण राहिल्यास तुर पीक नष्ट होण्याची भीती आहे. आतापर्यंत महागड्या कीटकनाशकाच्या फवारण्या करून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन कडून उत्पन्नाची अपेक्षा होती यंदा मात्र ती फूल ठरली, त्यामुळे आंतरपीक म्हणून पेरलेल्या तुरीतून तरी आता हातावर चार पैसे मिळावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.. मात्र आता वातावरणात होणाऱ्या बदलामुळे या पिकातून देखील उत्पन्न मिळते की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे...
   काय कराव्या उपाययोजना...
ढगा हवामानामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव तुरीवर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यानुसार प्रती पंप इमामेक्टीन बेंजोएट १० -१५ ग्रॅम ढगाळ वातावरणामुळे होणाऱ्या प्रादुर्भावाच्या संरक्षणाकरता एम ४५ प्लस कार्बन डेझीम ३० ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी. तुरीच्या पिकांची नियमित पाहणी करावी आणि किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास तात्काळ उपाययोजना कराव्या असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे...