देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी चिखली नगरी सज्ज! महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले आज भरणार अर्ज; महायुतीचे अतिविराट शक्ती - दर्शन होणार..

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आज,२८ ऑक्टोबरला चिखली नगरीत येत आहेत. निमित्त आहे महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचे.. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी चिखली नगरी सज्ज झाली असून आज अभूतपूर्व आणि अतिविराट असे शक्ती प्रदर्शन महायुतीच्या वतीने करण्यात येणार आहे..

माहायुतीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्वेताताई महाले पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. गावोगावच्या भेटीगाठी दौऱ्यांना उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आज,२८ ऑक्टोबरला श्वेताताई महाले पाटील आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास त्यासाठी चिखलीत येत आहेत. खामगाव चौफुली येथून महायुतीच्या रॅलीला प्रारंभ होईल. त्यानंतर ही रॅली बस स्टॅन्ड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ,जयस्तंभ चौक, संकटमोचन हनुमान मंदिर चौक, मार्गे राजा टॉवर येथे पोहचणार आहे. इथे होणाऱ्या जाहीर सभेला देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत.सभेनंतर श्वेताताई महाले पाटील आपला नामांकन अर्ज दाखल करतील.या सभेचे थेट प्रक्षेपण "बुलडाणा लाइव्ह"च्या यू- ट्यूब प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे...