मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलडाण्यात! विजयराज शिंदेंच्या लेकीच्या विवाहसोहळ्याला लावणार हजेरी! भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजनही करणार! ९० मिनिटांचा दौरा! वाचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम...
May 16, 2025, 07:25 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज,१६ मे रोजी बुलडाण्यात येत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या लेकीच्या विवाह सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत. बुलडाणा शहरातील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये आज विजयराज शिंदे यांच्या कन्या डॉ.शिवानी आणि डॉ.निलेश यांचा विवाह सोहळा संपन्न होत आहे.. मुख्यमंत्री सचिवालयाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११.५० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाण्याकडे रवाना होतील. १२ वाजून २० मिनिटांनी ते बुलडाणा येथे हेलीपॅडवर पोहोचतील. त्यानंतर मोटारीने १२.३० वाजता बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी येथे पोहोचतील. तिथे विजयराज शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता मलकापूर रोडवरील म्हाडा कॉलनी जवळ भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन करतील. त्यानंतर १.५० वाजता बुलडाणा येथील हेलीपॅड वर पोहोचतील. १.५५ वाजता छत्रपती संभाजी नगर कडे रवाना होतील. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरात पोलिसांकडून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.