जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही! मोताळा तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत सदस्यांना दणका; जिल्हाधिकाऱ्यांनी केले सदस्यत्व रद्द...
Mar 5, 2025, 09:03 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निवडणूक जिंकल्यानंतर ठरलेल्या वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. मात्र निश्चित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे ३३ ग्रामपंचायत सदस्यांच्या अंगलट आले आहे. मोताळा तालुक्यातील विविध गावांतील ३३ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी हे आदेश काढले आहेत.
मोताळा तालुक्यातील १४ ग्रामपंचायत मधील ३३ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. निर्धारित वेळेत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. यामध्ये इब्राहिमपूर ग्रामपंचायतचे गांगु ईश्वरसिंग तघरे, कुन्हा येथील विलास मंझा, बबीता पेळे, वर्षा घोती, अतुल डांगे,बबिता साबळे, जयवंत मंझा, नारायण साबळे, कोऱ्हाळा बाजार शारदा वाघ, कोल्ही गोलर चे शारदा निशानकर, चिंचपूरच्या सुनंदा अहिरे, आशा मापारी, तरोडा ग्रामपंचायतचे दिनेश घोती, अनुपसिंग येरवाळ, सुषमा कटारे, अनिता धिरबस्सी, धारासिंग मंझा, शिल्पा बस्सी, एकनाथ जाधव, आशा जाधव धामणगाव देशमुखचे मुकेश पवार, अनुसया धाबे, पिंपळगाव नाथचे नटवरलाल जाधव, सरस्वती नाईक, महाळुंगी जहांगीर येथील ताराबाई इंगळे , माळेगाव ग्रामपंचायत च्या पूजा इंगळे, शोभा इंगळे तर मोहेगाव ग्रामपंचायत च्या सुमन बरडे या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे