विनापरवाना मोर्चा काढल्याने वंचित'च्या चारशे ते पाचशे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!काल खामगाव'मध्ये काढण्यात आला होता भव्य मोर्चा!

 
Morcha
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):विनापरवाना मोर्चा काढल्याने वंचित च्या चारशेहुन अधिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आपल्या विविध मागण्यांसाठी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर न.प. मैदान ते खामगाव उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
हा मोर्चा काढताना कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग केली आहे.मा जिल्हाधिकारी यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे.याप्रकरणी पो हे कॉ विनोद राठोड यांनी तशी तक्रार खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून वंचित'चे जिल्हाध्यक्ष देवराव हिवराळे,शरद वसतकार, शांताराम पाटेखेडे,प्रकाश धुंदळे, धम्मपाल नितनवरे, अजय गवई, अतुल इंगळे, गौतम नाईक,बाळू मोरे,देवा निंबाळकर, करण त्रिभुवन,रवींद्र भोजने, अनिल अंबलकार, नितेश हिवराळे, गौतम सुरवाडे सह चारशे ते पाचशे अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार हे करीत आहेत.