BIG BREAKING हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या ८ कार्यकर्त्यांना बुलडाणा पोलिसांनी घेतले ताब्यात....! सपकाळ म्हणाले, हुकूमशाहीचा अतिरेक झाला....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलडाणा शहराच्या दौऱ्यावर आहेत. शिवस्मारकासह २१ महापुरुषांच्या स्मारकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील बुलडाणा शहराच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार संजय गायकवाड आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटण्याचे केलेले वक्तव्य यामुळे हा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा होत असल्याने खबरदारी म्हणून बुलढाणा शहर पोलिसांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ८ जणांना ताब्यात घेतले आहे. 
Gaykwad
Advt
हर्षवर्धन सपकाळ यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. देशात, राज्यात ,गल्लीत सगळीकडे हुकूमशाही सुरू आहे. लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा हा प्रकार आहे. हुकूमशाहीचा अतिरेक झाला आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
Jadhav