बुलडाणा जिल्हा महायुतीचा गड! सातही आमदार महायुतीचे निवडून येणार! ना.प्रतापराव जाधवांनी सांगितलं राहुल गांधींचा दौरा रद्द होण्याचे कारण...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा हा महायुतीचा गड आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे महायुतीचेच निवडून येतात. यावेळी देखील जिल्ह्यातील सातही मतदारसंघात महायुतीचेच आमदार निवडून येणार आहेत असा विश्वास केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ना. प्रतापराव जाधव म्हणाले की बुलडाणा जिल्हा महायुतीचा गड असल्याचे राहुल गांधींना कुणीतरी सांगितले असावे, त्यामुळे पडणाऱ्या उमेदवारांचा प्रचार कशाला करायचा असा विचार त्यांच्या मनात आला असेल म्हणून त्यांनी दौरा रद्द केला असेल असेही ना.जाधव म्हणाले.

 यावेळी बोलतांना ना.प्रतापराव जाधव म्हणाले की, महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या योजना आणल्या आहेत. महिलांच्या तरुणांच्या सक्षमीकरणाचे काम आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचे हे ठरवले आहे.. महाराष्ट्रात बहुमताने महायुतीचे सरकार येणार असून त्यात बुलडाणा जिल्ह्यात महायुतीचे सात आमदार असतील असे ना.प्रतापराव जाधव म्हणाले.