BREAKING ठरलं हो बाप्पा..! चिखलीत भाजपकडून उमेदवारीची माळ पंडितराव देशमुखांच्या गळ्यात! शेवटच्या क्षणी झाला निर्णय; थोड्या वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज...

 
चिखली(बुलडाणा  लाइव्ह वृत्तसेवा):  हो नाही म्हणता म्हणता अखेर चिखली नगराध्यक्ष पदाचा भाजपचा उमेदवार फायनल झाला आहे.. डॉ .संध्या कोठारी की पंडितराव देशमुख असा पेच पक्ष नेतृत्वाकडे गेल्या कित्येक दिवसांपासून होता..अखेर आज आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या निवासस्थानी बंदर द्वार झालेल्या चर्चेअंती पंडितराव देशमुख यांची उमेदवारी फायनल झाली आहे..
चिखली

पंडितराव देशमुख हे याआधी भाजपचे  शहराध्यक्ष होते. नगरसेवक म्हणूनही त्यांना काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. भाजपचे अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. चिखलीत संध्या कोठारी की पंडितराव देशमुख अशा चर्चा चौकात चौकात रंगत होत्या. अखेर पंडितराव देशमुख यांच्या नावावर शिक्कामार्फत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आ.महाले आणि पंडितराव देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत.. संध्या कोठारी यांची समजूत कशी काढली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. बंद द्वार नेमकी काय चर्चा झाली हे सुद्धा गुलदस्त्यात आहे... मात्र चर्चेचा निष्कर्ष पंडितराव देशमुख यांच्या उमेदवारीत निघाला आहे...आता काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी देण्यात येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल..