BREAKING ठरलं..! ८ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुलडाण्यात; जयश्रीताईंसाठी घेणार प्रचार सभा; हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकरांचे आवाहन....

 

 महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचा पराभव करण्याच्या जिद्दीने उबाठा शिवसेना पेटलेली आहे. त्याअनुषंगाने बुलडाणा येथे उद्धव ठाकरे यांची सभा लावण्यात आली आहे. ८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता, बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी समोरील मोकळ्या मैदानात(सध्या जिथे फटाका मार्केट आहे)ही भव्य सभा होणार आहे. ही सभा गर्दीचा उच्चांक नोंदवणारी व्हावी या दृष्टीने तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केले आहे..