BREAKING राष्ट्रवादीचे डी. एस. लहाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत! मातोश्रीवर झाला प्रवेश

 

 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधवा महिलांसाठी पुनर्विवाहाची चळवळ चालवणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी आज, शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्रीवर हा सोहळा झाला, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डी.एस.लहाने यांनी शिवबंधन बांधले. 

प्राध्यापक दत्तात्रय लहाने माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलढाणा तालुकाध्यक्ष म्हणूनही ते काम सांभाळत होते. विधवा महिलांच्या पुनरुत्थानासाठी त्यांनी केलेली चळवळ आता व्यापक स्वरूपात पुढे जात आहे. दरम्यान आज, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत , सहसंपर्कप्रमुख छगन मेहत्रे, दिलीप वाघ आदी नेते यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते.

बुधवतांचे हात बळकट...

शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी पक्ष फुटी नंतरही जिल्ह्यात शिवसेना संघटन मजबूत पद्धतीने बांधले आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना प्राध्यापक लहाने यांचा शिवसेना प्रवेश बुधवंत यांची शक्ती वाढवणारा ठरणार आहे...