BREAKING मेहकरात डॉ. ऋतुजा चव्हाण यांची वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर!
डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या, मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत विकास गंगा पोहचवणार! मेहकरात रंगणार दोन डॉक्टरांचा सामना...
Updated: Oct 21, 2024, 19:26 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या सामाजिक कार्याने सुपरिचित असलेल्या डॉ.ऋतुजा चव्हाण यांना अखेर वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघात त्या निवडणूक लढवत आहेत. आज, प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे मेहकर विधानसभा मतदारसंघात आ.डॉ.संजय रायमुलकर विरुद्ध डॉ.ऋतुजा चव्हाण या दोन डॉक्टरांचा सामना रंगणार हे निश्चित झाले आहे.
डॉ.ऋतुजा चव्हाण शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत. त्यांचे पती ऋषांक चव्हाण हे देखील सहकार व शेतकरी सर्व येथील लोकप्रिय नेतृत्व म्हणून समोर आले आहेत.. कित्येक दिवसांपासून मेहकर विधानसभा मतदारसंघात त्यांना जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. अखेर आता डॉ. ऋतुजा चव्हाण या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे... दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी सर्वस्वी प्रयत्न करेल.
मा जिजाऊंच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या साथीने मेहकरच्या विकासाचे नवे पर्व साकार करेल, माझ्या मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची संधी पोहोचवण्यासाठी सदैव कार्यरत राहील असे डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी म्हटले आहे.