BREAKING धृपदरावांचे कमबॅक! नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश; काँगेसने कोणता शब्द दिला?.

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील मातब्बर नेते माजी आमदार धृपदराव सावळे यांनी अखेर आज,१४ ऑक्टोबरच्या मुहूर्तावर काँग्रेसमध्ये घरवापसी केली. मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला, यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची देखील उपस्थिती होती...
धृपदराव सावळे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची बातमी तीन महिन्याची बुलडाणा लाइव्ह ने प्रकाशित केली होती, गेल्या आठवड्यापासून या चर्चेने अधिक जोर धरला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त धृपदरावांनी दिल्ली गाठून काँग्रेस प्रवेशाचे संकेत दिले होते. अखेर आज धृपदराव सावळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
धृपदराव सावळे यांनी काँग्रेस कडून बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याआधी ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील होते. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून चिखली विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता.त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना थेट जिल्हाध्यक्ष सारखे महत्वाचे पद दिले.धृपदराव जिल्हाध्यक्ष असताना भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली होती. मात्र जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यावर धृपदराव राजकीय विजनवासात गेले होते. त्यांच्या तब्येतीचाही प्रॉब्लेम होता..मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कमबॅक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता..अखेर ते आता काँग्रेसवासी झाले आहेत, त्यांना कोणता शब्द काँग्रेसने दिला हे त्यांचे त्यांना माहीत....