BREAKING मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या ७५ मिनिटांसाठी पुन्हा जिल्ह्यात! १५ दिवसांत दुसऱ्यांदा बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर! कारण काय? वाचा...
Oct 2, 2024, 21:38 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या,३ ऑक्टोबरला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. १५ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा बुलडाणा जिल्हा दौरा आहे. उद्या खामगाव येथील विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
श्री महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी अंतर्गत खामगाव येथील जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तू बांधकामाचा शुभारंभ सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी ९ वाजता सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस अभियांत्रिकी महाविद्यालय येथील हेलिपॅड वर मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन होईल. त्यानंतर ९.१५ वाजता घाटपुरी येथील जगदंबा माता मंदिर येथे मुख्यमंत्री शिंदे दर्शनासाठी पोहोचतील. त्यानंतर ९:३० वाजता जय जगदंबा विद्यालयाच्या नवीन वास्तू बांधकामाचा शुभारंभ सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. १०:१५ वाजता मुख्यमंत्री शिंदे पुन्हा हेलीपॅड वर पोहोचतील व हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजी नगर कडे पर्यंत..