BREAKING मित्रपक्षच फोडला! बुलढाण्यात योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात भाजपात जम्बो पक्षप्रवेश; शिवसेनेचे मुन्ना बेंडवाल भाजपात;

माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सिनकर, नंदू लवंगे यांचाही भाजपात प्रवेश..
 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याचे भाजप नेते योगेंद्र गोडे यांनी आज अनेक बड्या चेहऱ्यांचा भाजपा प्रवेश करून घेतला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. विशेष म्हणजे भाजपने मित्र पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल यांनाही भाजपवासी करून घेतले. मुन्ना बेंडवाल हे आ. संजय गायकवाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते. याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सिनकर, ऑल इंडिया मल्हार युवा सेनेचे अध्यक्ष नंदू लवंगे, माजी पंचायत समिती सदस्य विशाल सोनूने, मिलिंद कुलकर्णी, निलेश आवडकर यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. 

   

 
   मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांची देखील उपस्थिती होती. योगेंद्र गोडे यांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा झाला. पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व नेत्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केले..