BREAKING बुलडाण्यात भाजपची पत्रकार परिषद! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा प्लॅन; विजयराज शिंदे म्हणाले, बंडखोरी...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. बुलडाण्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या तयारीची माहिती दिली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महासंपर्क अभियान राबविणार आहे. जिल्ह्यातील सर्वच बुथवर हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ.गणेश मांटे यांनी दिली.

 

 

 

पुढे बोलतांना डॉ. मांटे म्हणाले की, "सपने नही हकीकत बुनते है.."अशी भाजपची प्रतिमा आहे. मोदींच्या नेतृत्वात देशात तिसऱ्यांदा NDA चे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी फेक नेरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेने अपप्रचार हाणून पाडला.👇

 

 

सबका साथ सबका विकास या मुलमंत्रावर काम करून भाजपने देशभर विकासाचे काम केल्याचे ते म्हणाले. याच विकासाच्या मुद्यावर महायुती सरकार देखील महाराष्ट्रात काम करत आहे असे डॉ.गणेश मांटे म्हणाले. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप महासंपर्क अभियान सुरू करत करत आहे . घाटावरील ४ विधानसभा मतदारसंघातील १३३३ बुथवर, आणि शक्तिकेंद्रावर महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.👇

 

   बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात,चिखलीत आ. श्वेताताई महाले, सिंदखेडराजात डॉ.गणेश मांटे, तोताराम कायंदे, विनोद वाघ, मेहकर येथे प्रकाश गवई, सारंग माळेकर यांच्या नेतृत्वात महासंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याचे डॉ.गणेश मांटे म्हणाले.बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक आमदार महायुतीचे निवडून येतील. जागावाटपात बुलडाणा जिल्ह्यात भाजप म्हणून आम्ही जास्तीत जास्त जागा लढवण्याचा आग्रह वरिष्ठ नेतृत्वाकडे केला आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची जागा देखील भाजपला मागितल्याचे डॉ. मांटे म्हणाले..👇
विजयराज शिंदे म्हणाले ..
बुलडाणा विधानसभा मतदारसंघ भाजपला घ्यावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केली आहे. विधानसभा निवडणूक कुणाला लढावी वाटत नाही? असा प्रतिसवाल करत जागा वाटप झाल्यावर " बंडखोरी करणार की नाही हे ठरणार" असे सूचक वक्तव्य माजी आमदार विजयराज शिंदे म्हणाले..