EXCLUSIVE सिंदखेडराजा मतदारसंघातील "त्या" २२ गावांतील भाजप कार्यकर्त्यांच ठरलं! विचारधारेलाच महत्व देणारं; डॉ.शशिकांत खेडेकरांना साथ देण्याचा एकमुखी निर्धार! अंचरवाडीत पार पडली बैठक....
Updated: Nov 10, 2024, 08:41 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होते आहे. शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील इथे आपला उमेदवार दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी कोणती भूमिका घ्यावी? याबाबत संभ्रम सुरू होता. त्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी देऊळगावराजा येथे एक बैठकही झाली होती. त्या बैठकीत नैसर्गिक युती, आणि विचारधारा या मुद्द्यांवर डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी उभे रहावे अशी मते बहुतांश कार्यकर्त्यांनी मांडली होती. त्या बैठकीचा अहवाल प्रदेशाकडे पाठवलेला आहे. दरम्यान काल,९ नोव्हेंबरच्या सायंकाळी सिंदखेडराजा मतदार संघात असणाऱ्या चिखली तालुक्यातील २२ गावांतील भाजप कार्यकर्त्यांची बैठक अंचरवाडी येथे झाली. या बैठकीत विचारधारेशी एकनिष्ठ राहत डॉ.शशिकांत खेडेकर यांना साथ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर डॉ.शशिकांत खेडेकर यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली...
भाजप - शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. डॉ.शशिकांत खेडेकर गेल्या २५ वर्षांपासून भाजपा - शिवसेना विचारधारेशी जोडलेले आहेत. त्यामुळे रिकाम्या भानगडीत न पडता विचारधारेला महत्व देत डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे असा एकमुखी सुर या बैठकीत उमटला. महायुतीत फूट फडावी ही खेळी डॉ.शिंगणे यांनीच रचली असल्याचा आरोपही भाजप कार्यकर्त्यांनी बैठकीत केला. त्यामुळे डॉ.शिंगणे यांना अद्दल घडवायचीच असा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.
भाजपा कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. खेडेकर यांना देखील या बैठकीचे निमंत्रण दिल्याने ते देखील तातडीने अंचरवाडी येथे पोहचले."मी आतापर्यंत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भाजपा- शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. आपली विचारधारा एक आहे. यापुढेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान दिल्या जाईल" असा शब्द यावेळी डॉ.शशिकांत खेडेकर यांनी दिला. भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर डॉ.शशिकांत खेडेकर यांची गावातून मिरवून काढण्यात आली..यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला..