भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्याचा जिल्हा पुढे ढकलला..! विधानसभा मतदारसंघाचा घेणार होते आढावा; पण...

 
बुलडाणा

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या,१४ सप्टेंबरला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्याची जंगी तयारी करण्यात आली होती. मात्र आत्ता थोड्या वेळापूर्वी हाती आलेल्या माहितीनुसार हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. 

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उद्या भाजप प्रदेशाध्यक्ष चिखली, मलकापूर आणि खामगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार होते. मात्र आता हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांचा मुंबईत कार्यक्रम असल्याने प्रदेशाध्यक्ष या नात्याने बावनकुळे त्या तयारीत गुंतले आहेत. त्यामुळे उद्याचा दौरा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.