BIG NEWS डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा नामुष्कीजनक पराभव! सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आले नाही; नव्या दमाच्या मनोज कायद्यांना जनतेची पसंती...; विजयाचा जल्लोष सुरू....
Updated: Nov 23, 2024, 21:10 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची लढत अत्यंत सुरक्षित झाली.. आधी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले मनोज कायंदे यांनी एकदम उच्चांकी उसळी मारली असून त्यांचा विजय झाला आहे.. डॉ.राजेंद्र शिंगणे यांना मात्र नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.. डॉ.शिंगणे आणि सत्ता हे समीकरण जनतेने उधळून लावले आहे.. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आले नाही हे जनतेने दाखवून दिले. डॉ. राजेंद्र शिंगणे यांना जनतेला गृहीत धरणे चांगलेच महागात पडले आहे...नव्या दमाच्या मनोज कायंदे यांना सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील जनतेने डोक्यावर घेतल्या असून आता मनोज कायंदे यांच्यापुढे आमदार ही उपाधी लागली आहे...
अगदी वेळेवर तिकीट मिळूनही मनोज कायदे यांनी दमदार प्रचाराचे नियोजन केले. शेवटच्या दोन-तीन दिवसात मनोज कायंदे यांची लाट निर्माण झाली..आता ही लाट विजयात परावर्तित झाली आहे.. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये मनोज १० हजार मतांनी मागे होते. मात्र ती आघाडी त्यांनी मोडून काढली..२५ फेऱ्या अंती मनोज कायंदे यांना ७२ हजार २५६ मते , दुसऱ्या क्रमांकावरील डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ६७ हजार ५५३ तर तिसऱ्या क्रमांकावरील डॉ. शशिकांत खेडेकर यांना ५९ हजार ८३८ मते मिळाली. ४ हजार ९९२ मतांनी मनोज कायंदे यांचा विजय झाला आहे... हा विजय मनोज कायंदे यांनी जनतेला समर्पित केला आहे, आज वडिलांची आठवण होत असल्याचे मनोज कायंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले...