BIG NEWS माळी समाजाचे एकमेव मुख्यमंत्री नायब सिंग सैनी श्वेताताईंच्या प्रचारासाठी आज चिखलीत! सकाळी ११ वाजता जाहीर सभा....
Nov 17, 2024, 09:21 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):माळी समाजाचे राष्ट्रीय नेते, एकमेव मुख्यमंत्री नायब सिंग सैनी (हरियाणा) हे आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रचारासाठी आज,१७ नोव्हेंबरला चिखली येथे येणार आहेत. सकाळी ११ वाजता चिखली शहरातील मौनीबाबा मठ येथे सैनी श्वेताताईंच्या विजयासाठी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार श्वेताताई महाले यांची ताकद दहापटीने वाढणार आहेत.
नायब सिंग सैनी हे माळी समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत. नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत नायब सिंग सैनी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी देत भाजपने माळी समाजाचा व ओबीसींचा सन्मान केलेला आहे. माळी समाज भाजपचा पारंपरिक मतदार राहिला आहे. दरम्यान आज नायब सिंग सैनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत, त्यासाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. थोड्या वेळापूर्वी पोलिसांच्या पथकाने सभास्थळाचा आढावा घेतला आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे...