Amazon Ad

BIG NEWS डॉ.राजेंद्र शिंगणेंना शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल! पलीकडच्या काठावर जाणार? सिंदखेडराजात उद्या कार्यकर्ता मेळावा...

 
 बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आज जाहीर झाल्या. त्यामुळे राजकीय घडामोडींना आता दहापटीने वेग आला आहे. आपण सध्या काठावर आहोत असे म्हणणारे डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आता पलीकडच्या काठावर जाण्याची तयारी जवळपास पूर्ण केल्याचे समजते. उद्या,१६ ऑक्टोबरला डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडून सिंदखेडराजात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.याच मेळाव्यात तुतारी हाती घेण्याची अधिकृत घोषणा डॉ.राजेंद्र शिंगणे करू शकतात अशी दाट शक्यता आहे.त्यामुळे उद्या होणाऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे...

महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. २२ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार असल्याने थोडे दिवस हाती आहेत. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी खेळलेल्या खेळीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांना आतापर्यंत फारशी तयारी करता आली नाही.एकंदरीत डॉ.शिंगणे यांच्या भूमिकेमुळे सारेच कन्फ्युज होते..मात्र आता उद्या डॉ.राजेंद्र शिंगणे सगळा संभ्रम दूर करण्याची शक्यता आहे..

  मागील आठवड्यात आ. डॉ.शिंगणे सुप्रिया सुळे यांच्या वाहनात फाईलने तोंड लवतांना दिसले होते.त्याचवेळी डॉ.शिंगणे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अंचरवाडी येथील एका भूमिपूजन सोहळ्यात डॉ.शिंगणे यांना सरकारवर टीका देखील केली होती, शिवाय मी सध्या काठावर आहे असे विधान केले होते. दरम्यान आता अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठावर जाण्याची परिपूर्ण तयारी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडून झाली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. उद्या,१६ ऑक्टोबरला सिंदखेडराजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित मेळाव्यात आमदार डॉ.शिंगणे पुढील भूमिका जाहीर करणार आहेत..