मोठी बातमी! उबाठा शिवसेना पुन्हा फुटली! डॉ.मधुसूदन सावळे यांचा भाजपात प्रवेश...

 

 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा उबाठा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावळे यांनी भाजपात प्रवेश केला..
विवाह सोहळा
Advt. 👆

 डॉ.सावळे यांचा बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. शिवसेना तालुकाप्रमुख म्हणूनही त्यांनी बरीच वर्ष काम पाहिले आहे. दोन वेळेला अगदी विधानसभा निवडणुकीची तयारी करूनही शेवटच्या टप्प्यात त्यांचे तिकीट कटले होते. अखेर डॉ.सावळे यांनी भाजपा जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी भाजपात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाची गंगा वाहत होते. भाजपचे विकासाचे धोरण पसंतीस पडल्याने भाजपात प्रवेश केल्याचे डॉ.सावळे यांनी सांगितले.