मोठी बातमी! रविकांत तुपकरांची मोठी घोषणा; क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना; कोणत्याही पक्षात जाणार नाही! कुणासोबत आघाडी करायची यासाठी "हे"४ पर्याय समोर..दोन दिवसांत निर्णय.

 
  
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बुलडाणा येथे बोलावली होती. चिखली रोडवरील गोलांडे लॉन्स येथे हा मेळावा झाला.. या मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. अखेर या मेळाव्यात रविकांत तुपकर यांनी मोठा निर्णय घोषित केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्यानंतर शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी रविकांत तूपकर यांनी "क्रांतिकारी शेतकरी संघटनेची" स्थापना करीत असल्याचे आज जाहीर केले. विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, आता कुणासोबत आघाडी करायची ती "क्रांतिकारी शेतकरी संघटना" म्हणून होईल. असेही रविकांत तुपकर यांनी जाहीर केले..
 आपल्यासमोर सध्या ४ पर्याय आहे. पहिला पर्याय महाविकास आघाडीचा, दुसरा महायुतीचा, तिसरा वंचित बहुजन आघाडीचा आणि चौथा पर्याय म्हणजे स्वतंत्र लढणे असा आहे रविकांत तुपकर म्हणाले. महाविकास आघाडी सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे असेही तुपकर यांनी सांगितले.
हवे तर एखाद्या वेळेला सकारात्मक चर्चा होऊन आपण त्यांच्यासोबत गेलो तर त्यांच्या सिम्बॉलवर निवडणूक लढवू मात्र "क्रांतिकारी शेतकरी संघटना" म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राहील असेही रविकांत तुपकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी युती - आघाडीसोबत चर्चा करण्यासाठी १० जणांची कोअर कमिटी स्थापन करण्यात येणार असून कोअर कमिटीला त्यासंबंधीचे अधिकार देण्यात येणार असल्याचेही तुपकर यावेळी म्हणाले..