मोठी बातमी! राहुल बोंद्रेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला....! विकासकन्या श्वेताताई महाले यांनी उधळला विजयाचा गुलाल; मंत्री पदाकडे वाटचाल....

 

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काही झाले तरी विजय माझाच होईल...मीच जिंकणार आहे असा ओव्हर कॉन्फिडन्स राहुल बोंद्रे यांना नडल्याचे निकालांअंती दिसून आले आहे... राहुल बोंद्रे यांचा चिखली विधानसभा मतदारसंघातून विजय होईल असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल वाल्यांनी वर्तवला होता.. मात्र तो सपशेल खोटा ठरला असून विकासकन्या श्वेताताई महाले पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळला आहे... महाराष्ट्रात देखील महायुतीची मोठ्या बहुमताने सत्ता येत असल्याने श्वेताताई महाले पाटील मंत्री पदाच्या शर्यतीत आल्या आहेत...

चिखली विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सुरुवातीपासून श्वेताताई महाले पाटील यांनी आघाडी घेतली होती. मध्यंतरी राहुल बोंद्रे ५०० मतांनी पुढे निघाले होते..मात्र त्यानंतर राहुल बोंद्रे यांना वरचढ होण्याची एकही संधी मिळाली नाही. अखेर २५ फेऱ्याअंती श्वेताताई महाले पाटील ४१०० पेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.. चिखलीत श्वेताताईंच्या विजयाचा प्रचंड जल्लोष सुरू झाला आहे.. हा विजय विकासाचा आहे.. हा विजय जनमताचा आहे , हा विजय महायुतीच्या एकजुटीचा आहे अशी प्रतिक्रिया श्वेताताई महाले पाटील यांनी दिली असून हा विजय त्यांनी जनतेला समर्पित केला आहे. 
.