मोठी बातमी! डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर उद्या डोणगाव येथे; जाहीर सभेला करणार संबोधित; हक्काच्या ऋतुजाताईंसाठी वाढतेय प्रचंड जनसमर्थन..

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजाताई चव्हाण यांना जन माणसातून प्रचंड जनसमर्थन मिळते आहे. हजारो शेतकरी शेतमजुरांची चळवळ डॉ.ऋतुजाताई चव्हाण यांच्यासाठी एकवटली आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे फायरब्रँड नेते, स्टार प्रचारक सुजात आंबेडकर ऋतुजाताईंच्या प्रचारासाठी उद्या, १६ नोव्हेंबरला डोणगाव येथे येत आहेत, त्यामुळे ऋतुजाताईंचे पाठबळ चांगलेच वाढणार आहे..
  उद्या,१६ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता डोणगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळे समोरील जुनी गुजरी येथे सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे. सुजात आंबेडकर फायर ब्रँड वक्ते आहेत, त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमणार आहे. शिवाय डॉ.ऋतुजा चव्हाण यांचे बळ देखील दहापटीने वाढणार आहे. आमदार संजय रायमुलकर यांच्याशी डॉ.ऋतुजा चव्हाण यांची थेट लढत होत आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार स्थानिक नसल्याने ती बाब देखील डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या पथ्यावर पडणार आहे. डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी शेतकरी चळवळीसाठी दिलेले योगदान, विविध प्रश्नांवर घेतलेली आंदोलनात्मक भूमिका यामुळे डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्यासाठी गावोगावी जबरदस्त समर्थन मिळत आहे. उद्या होणारी सुजात आंबेडकर यांची सभा डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्याबाजूने वार फिरणारी ठरणार आहे...