BIG BREAKING लागल्या हो लागल्या..अखेर निवडणुका लागल्याच! बुलढाणा जिल्ह्यात निवडणुका जाहीर...२८ एप्रिलला होणार मतदान..! भर उन्हात ग्रामीण भागातील राजकारणाचे टेंपरेचर वाढणार; आजपासून आचारसंहिता..
असा आहे कार्यक्रम..
राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ५९ ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आज १७ मार्च २०२६; च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. निवडणूकीची अधिसूचना सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दि. ७ ते १३ एप्रिल २०२६ पर्यंत सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजूपासून छाननी संपेपर्यंत. दि. १७ एप्रिल २०२६ रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या निवडणूकीचे मतदान मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायं ५.३० वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी बुधवार दि. २९ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.