BIG BREAKING सिंदखेडराजात डॉ. शशिकांत खेडेकरांसाठी सगळं काही चांगलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डॉ.शशिकांत खेडेकर यांना जाहीर पाठिंबा; महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून घेतला निर्णय....
Updated: Nov 18, 2024, 12:20 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा मतदार संघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत होती. शिवसेनेच्या वतीने डॉ. शशिकांत खेडेकर यांना तर अजित पवारांचे राष्ट्रवादीने मनोज कायंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून डॉ. शशिकांत खेडेकर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे यांच्या स्वाक्षरीने हे प्रसिद्धीसाठी देण्यात आल्याचे व्हायरल संदेशात म्हटले आहे.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या व व्हायरल होत असलेल्या पत्रकात म्हटले आहे. व्हायरल होत असलेले पत्र खरे की खोटे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान बुलडाणा येथे केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांना याबाबत विचारणा केली असता, अद्याप याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.
वरिष्ठ पातळीवर निर्णय? खाली काय..
दरम्यान डॉ.शशीकांत खेडेकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर झालाच तर सिंदखेडराजा येथे स्थानिक पातळीवर या निर्णयाला सहमती होते का? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे...