BIG BREAKING संजय गायकवाडांचे टेन्शन वाढलं? जयश्रीताई शेळके देणार तगडे आव्हान; हातावर बांधले शिवबंधन! एबी फॉर्मही मिळाला....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या टेन्शन चांगलेच वाढले आहे.. प्रतिस्पर्धी म्हणून जो उमेदवार गायकवाड यांना नको होता त्या जयश्रीताई शेळकेच आता आमदार गायकवाड यांना तगडे आव्हान देणार आहेत. मुंबईत मातोश्री निवास्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला..यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांची देखील उपस्थिती होती..या पक्षप्रवेशाने अनेक दिवसांपासून तिढ्यात असलेल्या बुलडाणा विधानसभेच्या उमेदवारीचा प्रश्नही मार्गी लागला असून जयश्री शेळके याच उबाठा शिवसेनेच्या उमेदवार असतील हे फायनल झाले आहे. जयश्रीताई शेळके यांना शिवसेनेच्या वतीने एबी फॉर्म देखील मिळाला आहे.

 गेल्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. पंधरा दिवसांआधी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचेच नाव आघाडीवर होते. मात्र अलीकडच्या काही दिवसांत बुधवंत अल्पसंख्यांक असल्याने अडचण येऊ शकते हा नरेटीव्ह मातोश्रीवर सेट करण्यात आला, त्याचा फटका बुधवंत यांना बसला. त्यानंतर रविकांत तुपकर की जयश्रीताई शेळके यावर खल सुरू होता. काल, बुलडाणा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात रविकांत तुपकर यांनी शेतकरी क्रांतिकारी आघाडीशी घोषणा केली. कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही मात्र पक्षाचा पाठिंबा घेऊन निवडणूक लढवण्याचा विचार करू असे रविकांत तुपकर यांनी म्हटले होते..दरम्यान आज मुंबईत अतिशय वेगवान घडामोडी घडल्या. दुपारी रविकांत तुपकर यांना मातोश्रीवर बोलावून घेण्यात आले. त्यांची उद्धव ठाकरेंची चर्चा झाली..
मात्र त्या चर्चेत तोडगा निघाला नाही. त्यामुळे रविकांत तुपकर मातोश्री वरून बाहेर पडले. रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडी सोबत यावे, अपक्ष उभे राहू नये असा मातोश्री वरील चर्चेचा सूर होता. त्यामुळे आता रविकांत तुपकर यांची निश्चीत काय भूमिका घेतात हे अद्याप अद्याप समोर आली नाही. दरम्यान थोड्या वेळापूर्वी जयश्री शेळके यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे.त्यामुळे जयश्रीताई शेळके विरुद्ध संजय गायकवाड ही लढत आता अटळ आहे. जयश्रीताई शेळके यांना पक्षाच्यावतीने एबी फॉर्म देखील देण्यात आला असून त्या बुलढाण्याकडे रवाना झाल्या आहेत.