BIG BREAKING अखेर मुहूर्त निघाला...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे "या" तारखेला बुलडाण्यात!आ. संजय गायकडांची पत्रकार परिषदेत माहिती...
Sep 6, 2024, 15:42 IST
बुलडाणा(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय... अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बुलडाणा दौऱ्याला मुहूर्त निघाला आहे. याआधी अनेकदा हा दौरा जवळजवळ ठरला अशी चर्चा झाली होती..५ ऑगस्ट, २५ ऑगस्ट, ३० ऑगस्ट अशा तारखा चर्चिल्या गेल्या होत्या..आता अखेर कन्फर्म झालं आहे..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १९ सप्टेंबरला बुलडाण्यात येणार आहेत..स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी त्याबाबतची अधिकृत घोषणा आज,६ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगम चौकातील अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, जयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व महापुरुषांच्या इतर पुतळ्याचे अनावरण, एसपी ऑफिस चे उद्घाटन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आ.गायकवाड यांनी दिली.