BIG BREAKING डॉ. राजेंद्र शिंगणे स्पष्टच बोलले! सुप्रियाताईंच्या गाडीत असल्याची बातमी फेटाळली!
कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय घेणार असल्याचे म्हणाले....
Updated: Oct 16, 2024, 14:45 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मी सध्या काठावर आहे मागेही जाऊ शकतो पुढेही जाऊ शकतो असे म्हणणाऱ्या डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज सिंदखेडराजा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. दरम्यान आज डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना बुचकळ्यात टाकले आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे तुतारी हाती घेतील अशा बातम्या काही दिवसांपासून सुरू होत्या, आज आमदार डॉ.शिंगणे कार्यकर्ता मेळाव्यात तशी घोषणा करतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती..मात्र सगळ्यांचे अंदाज डॉ.शिंगणे यांनी "सध्यातरी"खोटे ठरवले... "मी या गटात गेलो,त्या गटात गेलो अशा बातम्या चालू आहे, मी सध्या इथच आहे..मी सुप्रिया सुळेंच्या गाडीत बसल्याच्या बातम्या सुरू होत्या.. मीच ती बातमी टिव्हीवर पाहिली असे म्हणत एकप्रकारे डॉ.शिंगणे यांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीत बसल्याचा आरोप फेटाळला ..पत्रकारांना या मेळाव्यात प्रवेश नव्हता..मात्र बुलडाणा लाइव्हच्या "खास" सूत्रांनी ही खात्रीशीर बातमी दिली आहे...
सिंदखेड राजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात बोलतांना मी सध्या इथच आहेत असे ते स्पष्टच बोलले. अनेक लोक असे आहेत ज्यांना माझ्यामुळे रस्ता सापडत नाही. बाकीच्यांनी आपापले ठरवा आधी कुठे जायचे, मी माझ केव्हाही ठरवेल असे डॉ.शिंगणे म्हणाले..
कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे..मी कशावरही उभा राहीलो तरी साथ द्याल का ? असा सवाल त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला त्यावेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीतून एक मुखी "हो" असे उद्गार बाहेर पडले...सध्या माझी अवस्था महाभारतातल्या अर्जुनासारखी झाली आहे, मला कृष्णाची गरज आहे असेही डॉ.शिंगणे म्हणाले.
डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांनी आपापली मते व्यक्त केली...शिंगणे साहेब घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असा एकमुखी सुर कार्यकर्त्यांच्या भाषणातून उमटल्याचे सूत्रांनी सांगितले..."राम कृष्ण हरी वाजवा तुतारी" अशा घोषणाही काही उत्साही कार्यकर्त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले....
माध्यमांशी बोलतांना डॉ.शिंगणे म्हणाले...
कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनी डॉ.राजेंद्र शिंगणे यांना गाठले..यावेळी डॉ.शिंगणे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक कशी लढावी यावर चर्चा झाल्याचे ते सांगितले. अलीकडच्या दोन तीन महिन्यांत काही कार्यकर्ते भेटले. मी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी ९९ टक्के कार्यकर्त्यांची इच्छा आहे .तशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. एक दोन दिवसांत जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन कार्यकर्त्यांच्य मनातील निर्णय घेऊ असे डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले. मी शरद पवारांचा सच्चा चाहता आहे असेही ते म्हणाले. अजित दादा पवारांशी एक महिना झाले माझे बोलणे नाही असेही डॉ.शिंगणे म्हणाले..शरद पवारांची आणि माझी भेट अलीकडच्या काळात झाली नाही, मात्र जयंत पाटलांशी माझी भेट झाली असे डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले...