उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी श्वेताताईंनी केले कुलदेवतेचे पूजन! थोरामोठ्यांचे आशीर्वादही मिळाले; श्वेताताई म्हणाल्या, विजयाचा विश्वास....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेता ताई महाले पाटील आज,२८ ऑक्टोबरला आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी उपस्थित राहणार आहेत. थोड्या वेळात खामगाव चौफुली येथून महारॅली सुरू होणार असून राजा टॉवर येथे जाहीर सभा होणार आहे. दरम्यान अर्ज भरण्याआधी श्वेताताई महाले पाटील यांनी घरी विघ्नहर्ता गणेशाचे व कुलदेवता तुळजाभवानी आणि चिखलीचे ग्रामदैवत रेणुका मातेचे पूजन करून देवतांचे आशीर्वाद घेतले.याशिवाय आई-बाबांचे व सासू-सासर्‍यांचे तसेच घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे दर्शन घेऊन श्वेता ताईंनी आशीर्वाद प्राप्त केले... "माझ्या कुटुंबीयांच्या समर्थ साथीमुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने विजय निश्चित आहे" अशी प्रतिक्रिया यावेळी श्वेताताई महाले पाटील यांनी दिली...