आ. संजय रायमुलकरांचा रेकॉर्डब्रेक मतांनी विजय होणार! खा.प्रतापराव जाधव यांना ठाम विश्वास...

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २४ तास सुखदुःखात हजर राहणारा माणूस या मतदारसंघातील जनतेला माहीत आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळात हजारो कोटी रुपयांचा निधी आ. संजय रायमुलकर यांनी मतदारसंघासाठी आणला, त्यातील बहुतांश कामे आता प्रगतीपथावर आहेत, त्यामुळे मेहकर विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत कोणताही संशय आमच्या मनात नाही.. शिवसेनेचा हा गड अभेद्य आहे..आ. संजय रायमुलकर विजयाचा चौकार मारतील यावेळचा त्यांचा विजय रेकॉर्डब्रेक असेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी दिली आहे..

  महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतलेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सातही जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असेही केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव म्हणाले. आ.संजय रायमुलकर यांचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही. प्रतिस्पर्ध्यांना इथे उमेदवाराही सापडला नाही, यावरून त्यांची अवस्था तुम्ही लक्षात घ्या..आम्ही विकासाच्या भरवशावर मते मागितली, ती आम्हाला भरभरून मिळणार आहेत असेही ना.जाधव म्हणाले...