बुलडाण्यात आज आयुष्यमान संवाद कार्यक्रम! केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत करणार मार्गदर्शन.

 
बुलडाणा
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथे आज आयुष्यमान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव व महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्यदायी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी या उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबवण्यात येतात. त्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना यासह विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, त्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी आज बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी येथे आयुष्यमान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप देखील होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भागवत भुसारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे.