मत विभाजन टाळा, भुलथापांना बळी पडू नका! काँग्रेस नेते दिलीप जाधव यांचे आवाहन! म्हणाले,संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीच सक्षम पर्याय! जयश्रीताईंच्या पाठीशी उभे रहा म्हणाले...
Nov 16, 2024, 08:04 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघात जयश्रीताई शेळके यांची विजयाकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे त्यांची मते खाण्यासाठीच काही उमेदवारांना उभे करण्यात आले आहे मात्र कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मतविभाजन टाळा आणि जयश्रीताई शेळके यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन काँग्रेस नेते दिलीप जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची लढाई ही इथल्या सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची लढाई आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके या खऱ्या अर्थाने शिव-फुले -शाहू आंबेडकरांच्या विचारधारेच्या पाईक आहेत. जयश्रीताईंचा विजय निश्चित असल्याने पराभवाच्या भीतीनेच इथे महायुतीवाल्यांनी काही उमेदवार जयश्री ताईची मते खाण्यासाठी उभे केलेली आहेत.संविधान प्रेमी नागरिकांची मते फोडण्याचा हा कुटील डाव आहे असेही दिलीप जाधव यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीला आणि
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात जयश्री ताईलाच प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.