शिवसेना उबाठा महिला आघाडी चिखली तालुकाप्रमुखपदी अनिता येवले! संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान....

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी चिखली तालुकाप्रमुखपदी अनिता गोविंद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख विजयाताई खडसान यांनी ही नियुक्ती केली. संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ फेब्रुवारी रोजी रायगड निवासस्थानी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 
धांडे
 Advt 
अनिता येवले ह्या तालुक्यातील ईसोली येथील रहिवासी आहेत. त्यांचे सासरे गजानन येवले माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. तर पती गोविंद येवले हे शिवसेना जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांचे कट्टर समर्थक व निकटवर्तीय असून त्यांच्यासोबत पक्षात सक्रिय आहेत. समाजकारण आणि राजकारणात येवले परिवार अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे अनिता येवले यांच्या नियुक्तीने ईसोली सर्कलमध्ये शिवसेना उबाठासाठी फायदेशीर मानले जात आहे. 
येणाऱ्या काळात शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या माध्यमातून चिखली तालुक्यातील महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करणार असल्याची भूमिका अनिता येवले यांनी व्यक्त केली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख विजयाताई खडसान, विश्वासराव खंडागळे, धोंडगे काका, गोविंद येवले, दीपक सावंत, राणी सावंत आदी उपस्थित होते.