अंढेऱ्याचे ठाणेदार विकास पाटलांची बदली! एपीआय रुपेश शक्करगे यांच्याकडे अंढेऱ्याचा प्रभार...
Feb 28, 2025, 09:19 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून आतापर्यंत जबाबदारी सांभाळलेल्या विकास पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी आता स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांच्याकडे अंढेरा पोलीस स्टेशन चा प्रभार सोपवला आहे. विकास पाटील यांची खामगाव शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.एसपी विश्व पानसरे यांनी काल,२७ फेब्रुवारीला या बदल्या केल्या आहेत.

Advt 👆
मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने अंढेरा येथे अफू जप्ती प्रकरणाची कारवाई केली होती. या प्रकरणामुळेच विकास पाटील यांची बदली केली गेली असावी अशी पोलिस वर्तुळात चर्चा आहे.