अन् त्या माऊलीने जालिंधर बुधवतांच्या डोक्यावरून फिरवला हात...डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते; म्हणाल्या.....

 
Budhvat

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मशाल जागर यात्रा टाकळी गावात पोहचली होती. मायमाऊल्या औक्षण करण्यासाठी ताट घेऊन तयार होत्या. तेवढ्यात एक आजी आली.. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. काय झालं? म्हणून नेते मंडळी विचारपूस करायला गेली तर "भाऊ उद्धव साहेबांना आमची कर्जमाफी केलती. त्यानं आम्हाले धीर भेटला. तुम्ही आले तर मला आमचा भाऊ आल्यासारखं वाटलं..." असं म्हणत त्या माऊलीने जालिंधर बुधवत यांना मायेनं कोंभाळत डोक्यावरून हात फिरवला . 

शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात मशालजागर यात्रा निघाली आहे. शेतकरी हिताच्या प्रश्नांसाठी मोताळा तालुक्यामध्ये गाव अन गाव ही यात्रा फिरत आहे. या यात्रेचा आजचा दुसरा दिवस होता. काल पहिल्याच दिवशी मिळालेला भरगच्च प्रतिसाद जालिंधर बुधवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ऊर्जा देऊन गेला. आज दुसऱ्या दिवशी देखील प्रत्येक गावात यात्रेचे दिमाखदार स्वागत झाले. 
 सकाळीच यात्रा राहेरी गावात दाखल झाली. त्यानंतर खामखेड, खडकी, मोहेगाव, खैरखेड, राजुर, मूर्ती,नेहरूनगर, वाघजाळ, टाकळी, परडा या गावांत यात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावांत फटाक्यांनी होणारे स्वागत, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला या गगनभेदी घोषणा यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादाची साक्ष देत होता..प्रत्येक गावातील नागरिकांची आपुलकीने विचारपूस करीत बुधवतांच्या नेतृत्वातील ही यात्रा पुढच्या गावाकडे मार्गस्थ होत होती...