अन् आमदार संजय रायमुलकरांना गहिवरून आलं.प्रसंगच तसा होता! नेमकं काय घडलं...वाचा...

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो..त्यामुळे सर्वसामान्यांचा राजकारणावर आणि राजकारण्यांवर फारसा विश्वास बसत नाही..मात्र काही मोजके नेते मात्र सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र ठरतात.. अशा नेत्यांवर लोक जीव ओवाळून टाकायला ही तयार असतात..अर्थात त्याला कारण असते ती त्या नेत्याची कार्यपद्धती..मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.संजय रायमुलकर हे त्यापैकीच एक.. रायमुलकरांवर मतदारसंघातील जनता प्रचंड प्रेम करते..कुणी भाऊ म्हणून, कुणी लेक म्हणून..कुणी मामा, काका, दादा म्हणून...नात्यांचा हा एवढा मोठा गोतावळा आ. रायमुलकरांजवळ जमला तोही आ. रायमुलकरांच्या स्वभावामुळेच..आपल्या मतदारसंघाला कुटुंबं मानणारे आ. रायमुलकर मतदारसंघातील जनतेची प्रचंड काळजी घेतात.. कुणाचा दवाखाना असो, कुणाचे दुःख असो वा कुणाच्या आनंदाच्या क्षण..आ. रायमुलकर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक कार्यात सहभागी असतात..त्यामुळेच मतदारसंघातील जनता आ. रायमुलकरांच्या प्रेमाची सव्याज परतफेड करतांना दिसली ती आतापर्यंतच्या तिन्ही निवडणुकांत...आता यंदा आमदार रायमुलकर यांची चौथी निवडणूक आहे, या निवडणुकीत देखील आ. रायमुलकरांचा प्रचार जनतेनेच हाती घेतल्याचे चित्र आहे..काल,२९ ऑक्टोबरला शेंदला येथे माय बाप जनतेचे प्रेम पाहून तर आमदार रायमुलकर यांच्या डोळ्यांत अश्रू आले..बोलतांना त्यांचा कंठही दाटून आला.....

 

शेंदला येथून ५०० भाविक काल हरीनामाचा गजर करीत पायी दिंडीने श्री क्षेत्र शेगाव कडे रवाना झाले. दिंडीला निरोप देण्यासाठी आ. रायमुलकर सपत्नीक उपस्थित होते." आम्ही श्री संत गजानन महाराजांकडे तुमच्या विजयासाठी साकडे घालायला जात आहोत" असे अनेक महिला भाविकांनी आ. रायमुलकर यांना सांगितले. यावेळी आ. रायमुलकरांच्या डोळ्यात अश्रू आले."माय माऊली व मतदारांचे एवढे प्रेम लाभलेला २८८ आमदारांमधील मी एकमेव आमदार असावा..हे माझे अहोभाग्य आहे.." अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार रायमुलकर यांना गहिवरून आले होते..साधू, संत सज्जनांचा आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते असे ते म्हणाले...