मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला खोट्या भुलथापा देऊन महिलांची गर्दी जमवण्याचा प्रयत्न..! काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा आरोप; कॉल रेकॉर्डींग व्हायरल केली;

म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये ऐवजी २००० मिळतील म्हणून फसवले.....

 
Bondre

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलडाणा दौऱ्यावर आहेत. शहरातील ऐतिहासिक शिवस्मारकासह २१ महापुरुषांच्या १६ स्मारकांचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झाले. याशिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसाराचा शासकीय कार्यक्रम देखील शारदा ज्ञानपीठच्या प्रांगणात होत आहे. जयस्थंभ चौकात राहुल बोंद्रे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी झालेल्या झटापटीत शेतकऱ्यांच्या रक्ताच्या सहीने लिहिलेले निवेदन फाटले. त्यानंतर राहुल बोंद्रे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.आता राहुल बोंद्रे यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी महिलांना अमिष दाखवल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे.

यासाठी राहुल बोंद्रे यांनी थेट एक कॉल रेकॉर्डिंगच त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. याशिवाय काँग्रेस समर्थकांकडून देखील ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. यात एक महिला आम्हाला लाडकी बहिण योजनेचे १५०० ऐवजी २००० रुपये मिळत असल्याचे सांगत आहे.

Jadhav
Advt 
राहुल बोंद्रे यांनी फेसबुकवर यासंदर्भातील पोष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला खोट्या भुलथापा देऊन गर्दी जमविण्याचा प्रयत्न झाल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. ज्या लाडक्या बहिणी बुलडाण्यात होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला येतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे १५०० ऐवजी २००० रुपये मिळणार असल्याचे खोटे सांगण्यात आल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. तशी एक कॉल रेकॉर्डींग राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या फेसबुक वर अपलोड केली आहे. या कथित कॉल रेकॉर्डींग मध्ये संबधित महिला आम्हाला १५०० ऐवजी २००० हजार रुपये मिळणार आहेत, आमची नावे लिहून घेतली आहे असे सांगत आहे.
गायकवाड
Advt