गावागावातील शेतकऱ्यांची फौज बुलडाण्यात दाखल व्हायला सुरुवात! थोड्याच वेळात होणार आक्रोश मोर्चाला सुरुवात....

 
Buldhana
 बुलडाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या संकल्पनेतील आक्रोश मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. गावागावातील शेतकऱ्यांची फौज बुलडाण्याच्या दिशेने रवाना झाली असून, हजारो शेतकरी बुलढाणा शहरात पोहोचले देखील आहेत. 
खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तोफा आज बुलडाण्यात धडाडणार आहेत. जिजामाता प्रेक्षागार मैदाना जवळील टिळक नाट्य मंदिराच्या मैदानातून आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा आक्रोश मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. ५ सप्टेंबर पासून निघालेल्या मशाल यात्रेचा समारोप या आक्रोश मोर्चा ने होणार आहे..